मुंबई: सिनेमा हिट करायचा म्हणजे त्याचं प्रमोशन तेवढ्याच जोमानं करणं गरजेचं आहे. त्यामुळे सिनेमा हिट करण्यासाठी प्रमोशनचे वेगवेगळे फंडे वापरले जातात. 'बॉम्बे वेलवेट'च्या टीमनंही प्रमोशनसाठी एक आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे.
रणबीर कपूर, अनुष्का शर्मा स्टारर 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा साठच्या दशकातील प्रेमी युगुलांची कहाणी आहे. या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी या सिनेमातील रणबीर, अनुष्काच्या कपड्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्यामुळं या सिनेमातील कपडे त्यांच्या चाहत्यांना ऑनलाईन खरेदी करता येणार आहेत.
सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपन केलं आहे. येत्या १५ मेला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.