मुंबई: रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचा फटका हे दोघं काम करत असलेल्या जग्गा जासूसला बसत आहे. दीपिकासोबत ब्रेक अप झाल्यानंतरही रणबीर आणि दीपिका चांगले मित्र आहेत, पण कतरिनासोबत मात्र रणबीरला मैत्रीचंही नातं ठेवायचं नाहीये.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोरकोला कतरिनासोबत एकत्र जायला रणबीरनं नकार दिला होता. मी पुढच्या विमानानं मोरकोला येईन पण कतरिनासोबतच्या विमानानं येणार नाही, असं रणबीरनं चित्रपटाच्या प्रोड्यूसरला सांगितलं.
आता तर या चित्रपटासाठी रणबीरनं कतरिनासोबत लिप लॉक करायला ही नकार दिला आहे, असा दावा बॉलीवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटनं केला आहे. मोरकोमध्ये या चित्रपटाचं एक रोमॅटिंग गाणं शूट होणार होतं. या गाण्यामध्ये रणबीर आणि कतरिनाचा लिप लॉक सीन होता, पण रणबीरनं या सीन करायला नकार दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता लीप लॉक सिनशिवायच हे गाणं शूट केलं जाणार आहे.