रणबीरकडून कतरिनाला मनवण्याचा प्रयत्न ?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं आता सगळ्यानांच माहिती आहे.

Updated: Feb 11, 2016, 09:56 PM IST
रणबीरकडून कतरिनाला मनवण्याचा प्रयत्न ?

मुंबई: रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं आता सगळ्यानांच माहिती आहे. रणबीरच्या स्वभावामुळेच कतरिनानं त्याला सोडल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. त्यातच आता रणबीर पुन्हा एकदा कतरिनाला मनवण्याचा प्रयत्न करतो आहे.

कतरिनाला मनवण्यासाठी रणबीरनं सिगरेट सोडल्याचं बोललं जात आहे. रिलेशनशीपमध्ये असताना कतरिनानं त्याला सिगरेट सोडण्याचा सल्ला अनेक वेळा दिला होता, पण रणबीरनं तेव्हा मात्र हा सल्ला गंभीरतेनं घेतला नव्हता.

कतरिनासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि अर्जुन कपूर बार्सिलोनामध्ये फूटबॉल मॅच बघताना दिसले, पण आपली सिगरेटची सवय सोडण्यासाठी, त्यावर उपचार घेण्यासाठी रणबीर बार्सिलोनाला गेल्याचं बोललं जात आहे. 

आता रणबीरच्या या वागण्यामुळे तरी कतरिनाचं आणि त्याचं पॅच अप होतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.