मुंबई : रणबीर - कतरिनाच्या ब्रेक अपनंतर आता अनेकांच्या नजरा अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडे लागल्यात. या दोघांतही काहीतरी बिनसल्याचं दिसून येतंय.
नुकतंच एका अॅवॉर्ड फक्शनमध्ये स्टेजवर दीपिकाबद्दल बोलताना रणबीर चक्क लाजला... आपलं प्रेम तो यावेळी लपवू शकला नाही... त्याच्या चेहऱ्यावरूनच ते दिसून येत होतं.
मात्र, यामुळे दीपिका मात्र चांगलीच भडकलीय. रणवीरनं आपल्या भावना असं सार्वजनिकरित्या व्यक्त करणं दीपिकाला अजिबात आवडलेलं नाहीय.
या दोघांच्या खूप जवळच्या असलेल्या एका मित्राच्या म्हणण्याप्रमाणे, रणवीर सिंग खूपच भावनात्मक आहे... तो आपल्या भावना लपवू शकत नाही. तो आपल्या मित्रांना गालावर किस करतो आणि महिला मित्रांनाही घट्ट मिठी मारतो... त्यानं असं वागलं नाही तर तो खरा रणवीर नसेलच... आणि इथेच गोची होते. त्यामुळे, दीपिका सोबत असताना कसं वागावं हेच त्या गरीब मुलाला कळत नाही.