मुंबई: मुंबईतील हॉस्पिटलमधून खांद्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह रविवारी घरी परतलाय. तो काही दिवस घरी आराम करणार आहे. रणवीरनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं, 'ऑपरेशन यशस्वी झालं. आता घरी जात आहे. काही दिवस आराम करणार जेणेकरून पूर्णपणे बरा होऊ शकेल. आपण सर्वांनी दिलेलं प्रेम आणि केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद.'
Surgery went well...Back home now & all set for the Rehab phase...Thank u all for ur love n concern! <3 #stongerthanbefore #eyeofthetiger
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 5, 2015
सोशल मीडियावर अभिनेता रणवीर सिंहचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यात तो हॉस्पिटलमधून बाहेर येतांना दिसतोय आणि हाथ हलवून आपल्या फॅन्सचं अभिवादन करतोय. रणवीर जॅकेट घालून होता आणि त्याचा एक हाथ पट्टीनं झाकलेला होता.
Live tweet from the operation theatre !! pic.twitter.com/jVud7qKFOL
— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 4, 2015
रणवीर संजय लीला भंसाळींचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'च्या सेटवर जखमी झाला होता आणि शनिवारी त्याच्या खांद्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यापूर्वी त्यानं ऑपरेशन थेटरमध्ये झोपलेला असतांना सेल्फी ट्विटरवर पोस्ट केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.