...आणि फारुख अब्दुल्लांनीही रणवीरसोबत ताल धरला!

अभिनेता रणवीर सिंगला नुकताच एका कार्यक्रमात 'एन्टरटेनर ऑफ द इअर' हा पुरस्कार दिला गेला. 

Updated: Feb 3, 2016, 02:53 PM IST
...आणि फारुख अब्दुल्लांनीही रणवीरसोबत ताल धरला! title=

नवी दिल्ली : अभिनेता रणवीर सिंगला नुकताच एका कार्यक्रमात 'एन्टरटेनर ऑफ द इअर' हा पुरस्कार दिला गेला. 

या कार्यक्रमाचं होस्टिंग करत होत्या एनडीटीव्हीच्या पत्रकार बरखा दत्त... आणि हा पुरस्कार रणवीरला राजनेते फारुख अब्दुल्ला यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी, फारुख अब्दुल्ला बॉलिवूडचे आणि रणवीरचे किती मोठे चाहते आहेत, हे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. 

यावेळी, बाजीराव-मस्तानी सिनेमातल्या एका गाण्यावर ७८ वर्षीय फारुख अब्दुल्ला यांनीही रणवीरसोबत ताल धरला.