फोटो आणि रिमा लागूंची पुण्यातली एक आठवण

शाळेत आठवीच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतल आणि मॅट्रिक पर्यंतच म्हणजेच, त्यावेळी अकरावीपर्यंतचं शिक्षण रिमा लागूंनी येथे घेतलं.

Updated: May 18, 2017, 04:31 PM IST
फोटो आणि रिमा लागूंची पुण्यातली एक आठवण

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू १९७० ते १९७४ या कालावधीत हुजुरपागा शाळेत शिकत होत्या. शाळेत आठवीच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतल आणि मॅट्रिक पर्यंतच म्हणजेच, त्यावेळी अकरावीपर्यंतचं शिक्षण रिमा लागूंनी येथे घेतलं.

 

reema_रिमा लागू या शाळेच्याच होस्टेलमध्ये राहत होत्या. शाळेत होणार्‍या आणि आंतरशालेय नाट्य स्पर्धांमध्ये त्या भाग घेत असतं. या काळात त्यांनी  मराठी आणि हिंदी नाटकांमधून भूमिका पार पाडल्या. ही माहिती आजही शाळेच्या रेकॉर्डवर आहे.

reema_one

रिमा लागू यांना शरीर यष्टीमुळे शाळेतील नाटकात पुरुष भूमिका मिळत. या नाटकांचे फोटो देखील उपलब्ध आहेत. रिमा लागू यांच्या शालेय जीवनातील आठवणी,  हुजुरपागा शाळेच्या मुख्याध्यापिका साधना झोडगे यांनी सांगितल्या.