अनुष्का-विराट जोक्सवर भडकला अभिनेता अर्जुन कपूर

भारत मॅच जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्यावरचे मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यास लगेचच सुरुवात होते. अनेक दिवसांपासून असे जोक्स हे सोशल साईट्सवर फिरतायंत.

Updated: Mar 29, 2016, 06:39 PM IST
अनुष्का-विराट जोक्सवर भडकला अभिनेता अर्जुन कपूर title=

मुंबई : भारत मॅच जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्यावरचे मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्यास लगेचच सुरुवात होते. अनेक दिवसांपासून असे जोक्स हे सोशल साईट्सवर फिरतायंत.

ऑस्ट्रेलिया विरोधात मॅच जिंकल्यानंतर देखील अनुष्कावर जोक्स फिरु लागले आणि अनेकांनी ते फॉरवर्ड देखील केले. यानंतर विराटला याचा एवढा राग आला की त्यांनी अशा लोकांना चांगलंच सुनावलं. 

विराटच्या ट्विटवर आता अभिनेता अर्जुन कपूर यांने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विराटच्या ट्विटचं समर्थन करत अनुष्का ही चांगली आणि बरोबर व्यक्ती आहे. तिचा मान राखला गेला पाहिजे. असं म्हटलं आहे.