मिनिषा लांबा गुपचूप चढली बोहल्यावर...

सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे... पण, याच दरम्यान बॉलिवूडच्या एक अभिनेत्री गुपचूपपणे लग्न करून मोकळी झालीय. 

Updated: Jul 7, 2015, 01:07 PM IST
मिनिषा लांबा गुपचूप चढली बोहल्यावर...

मुंबई : सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे... पण, याच दरम्यान बॉलिवूडच्या एक अभिनेत्री गुपचूपपणे लग्न करून मोकळी झालीय. 

ही अभिनेत्री आहे मिनिषा लांबा... मिनिषानं तिचा बॉयफ्रेंड रेयान थाम याच्यासोबत लग्नाची गाठ बांधलीय. 

रेयान थाम आणि मिनिषा लांबा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. बिग बॉस ८ मध्ये मिनिषा शेवटचं दिसली होती. 

मिनिषाचा या सिक्रेट विवाहाचा खुलासा केलाय अभिनेत्री पूजा बेदी हिनं... पूजानं एक ट्विट करून या दोघांना शुभेच्छा दिल्यात.

मिनिषाचा पती रेयान जुहूमधल्या एका नाईट क्लबचा मालक आहे. मिनिषा आणि रेयान यांची भेट २०१३ साली एका मित्रामुळे झाली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.