आमीर खानसोबत मातीचे ढिगारे उपसताना दिसली सई ताम्हणकर

अभिनेत्री सई ताम्हणकर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सुनील बर्वे आणि अभिनेत्री रीमा लागू हेदेखील होते. 

Updated: May 5, 2016, 09:37 PM IST
आमीर खानसोबत मातीचे ढिगारे उपसताना दिसली सई ताम्हणकर  title=

अमरावती : अभिनेत्री सई ताम्हणकर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत सध्या दुष्काळग्रस्तांना मदत करताना दिसतेय. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सुनील बर्वे आणि अभिनेत्री रीमा लागू हेदेखील होते. 

आमिर, सईनंही केलं श्रमदान

पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वाटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने अभिनेता आमिर खान आज अमरावती उपस्थित होता. जिल्‍ह्यातील वरुड तालुक्यात असलेल्‍या वाठोडा गावात आमिरसहीत सई, रीमा आणि सुनीलनंही श्रमदान केलं. 

३ तासांत उभारला बंधारा

यानंतर आमिर खाननं गावकऱ्यांशी संवाद साधला आणि गावातील कामांची माहितीही घेतली. यावेळी वाठोडा गावातील ३०० लोकांच्या सहभागामुळे ३ तासांत बंधारा उभारणं शक्य झालं.