मुंबई : सैराट चित्रपटात भूमिका करणाऱ्यांपैकी अनूजा मुळे हे शहरी भागातील होती, जवळ-जवळ सर्वच स्टार कास्ट ही ग्रामीण बोली भाषेत सराईत असताना, अनूजा मुळे म्हणजे चित्रपटातील आनीला बोली भाषा बोलताना खूप त्रास होत होता.
बोली भाषा बोलताना तिचा लहेजा फारच वेगळा आणि गंमतीदार येत होता, यावर ग्रामीण भागातील या मुलांनी तिची गंमत करण्याची संधी सोडली नाही.
प्रिन्स (सूरज पवार), आर्ची (रिंकू राजगुरू), परशा (आकाश ठोसर), सल्या (अरबाज शेख), लंगड्या (तानाजी गलगुंडे) हे चौघेही खेड्यातील आहेत. चित्रपटात त्यांच्या तोंडी ग्रामीण भाषाच आहे.
पण, त्यांच्यासोबत असलेली आर्चीची मैत्रीण आनी (अनूजा) शहरातील आहे. त्यामुळे बोली भाषा बोलताना तिचे उच्चार प्रमाण भाषेप्रमाणे येत होते. हे पाहून आर्ची, परशा, लंगड्या आणि सल्ल्याने तिची खूप थट्टा उडवली.