सैराटची आर्ची आता जाहिरातीतही

सैराट चित्रपटात बिनधास्त आणि रांगडी अभिनेत्रीची भूमिका केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरु घराघरात पोहोचलीये. सैराट चित्रपटाने रिंकूला अवघ्या एका रात्रीत स्टार बनवलंय.

Updated: Jun 5, 2016, 10:37 AM IST
सैराटची आर्ची आता जाहिरातीतही title=

मुंबई : सैराट चित्रपटात बिनधास्त आणि रांगडी अभिनेत्रीची भूमिका केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरु घराघरात पोहोचलीये. सैराट चित्रपटाने रिंकूला अवघ्या एका रात्रीत स्टार बनवलंय.

रिंकूची लोकप्रियता पाहता आता जाहिरात कंपन्यांकडूनही प्रॉडक्ट लाँचिगसाठी रिंकूला ऑफर येऊ लागल्यात. नुकत्याच 'गो' या एडिबल ऑईलचे प्रॉडक्ट लाँचिंग रिंकूच्या हस्ते पार पडलं. 

मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला सैराट कमाईच्या रेसमध्ये सुस्साट आहे. आतापर्यंत या सिनेमाने ८०कोटीहून अधिक कमाई केलीये. 

केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूडमध्येही या चित्रपटाची दखल घेण्यात आलीये. अनेक बॉलीवूड कलाकारांनी सैराटचे तोंडभरुन कौतुकही केले.  सैराटची टीम लवकरच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही दिसणार आहे.