'सैराट'चा आजपासून 'झिंगाट' सुरू

नागराज मंजुळेचा सैराट सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

Updated: Apr 29, 2016, 04:23 PM IST
'सैराट'चा आजपासून 'झिंगाट' सुरू title=

मुंबई : नागराज मंजुळेचा सैराट सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सैराटची २९ एप्रिल रोजी म्हणजे आज रिलीज झाला आहे. सैराट सिनेमाची गाणी सर्वांच्या डोक्यात धुमशान घालत असताना, सैराटबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून होती, ती उत्सुकता आजपासून पूर्ण होण्यास सुरूवात झाली आहे.

सैराटला पहिल्या दिवसापासून प्रचंड उदंड प्रतिसाद लाभत आहेत. सैराट मागील सर्वच मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणार असल्याचं दिसून येत आहे. 

सैराट नेमका कितीचा गल्ला जमवणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे, मात्र मागील रेकॉ़र्ड सैराट मोडीत काढणार हे आताच दिसून येत आहे.