सलमानच्या उत्पन्नाशी तुलना राजला पडली 'महाग'!

आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आलाय तो त्यानं स्वत:च्या कमाईची सलमान खानच्या कमाईशी केलेल्या तुलनेमुळे... सलमानच्या चाहत्यांनी यावरून राजला चांगलाच फैलावर घेतलंय. 

Updated: Jul 24, 2014, 11:34 AM IST
सलमानच्या उत्पन्नाशी तुलना राजला पडली 'महाग'! title=

मुंबई : आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आलाय तो त्यानं स्वत:च्या कमाईची सलमान खानच्या कमाईशी केलेल्या तुलनेमुळे... सलमानच्या चाहत्यांनी यावरून राजला चांगलाच फैलावर घेतलंय. 

त्याचं झालं असं, की कुंद्रा यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये ‘मी पैज लावू शकतो, की सलमानचंही एव्हढं (माझ्याएव्हढं) उत्पन्न नसेलं... किंबहुना माझ्या जवळपासही नसेल... मी फिल्म इंडस्ट्रीत केवळ माझ्या बायकोमुळे आहे... ती या इंडस्ट्रीचा भाग आहे म्हणून केवळ मी सिनेमा बनवतोय’ असं म्हटलं. 

मग काय, सलमानच्या फॅन्सनं ट्विटरवर राज कुंद्राला घेरलं. यावेळी, एका ट्विटला उत्तर देताना पुन्हा राजनं ‘किक’वर निशाणा साधला. ‘माझा द्वेष करणाऱ्यांसाठी... मला केवळ इतकंच म्हणायचंय की जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा त्याला मोठमोठ्यानं सांगण्याची काहीही गरज नसते... आणि मी काय करतो किंवा का करतो याचं तुमच्याशी काहीही देणं-घेणं नाही’... पण, थोड्यावेळानं मात्र आपली चूक लक्षात आल्यानंतर राजनं हे ट्विट काढून टाकलं.  

मग, आणखी एका ट्विटमध्ये राज म्हणाला, ‘मित्रांनो, मी सगळ्याच कामांचा सन्मान करतो. तुमच्याकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग असतात. इंटरव्ह्यूमध्ये मी जे काही म्हटलं ते केवळ एक बिझनेसमन म्हणून... माझा उद्देश कुणालाही दुखावण्याचा नव्हता’.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.