मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट एंड रन केस प्रकरणी एक नवं वळण आलं आहे. सलमान खानचे वकिल अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाला बुधवारी सांगितलं की, अनेक दस्तऐवज या प्रकरणी पेपर बुकमध्ये सामिल केले जाणार नाहीत.
पेपर बुक न्यायालयाचं रजिट्रार तयार करते. यात सर्व पुरावे आणि दस्तऐवज असतात. या प्रकरणी सुनावणी होण्याआधी पेपर बुक दोन्ही पक्षांना सोपवलं जातं, यावरून दोन्ही पक्षाचे वकिल आपला तर्क तयार करतात.
सलमानचे वकील अमित देसाई यांनी दावा केला आहे की, बचावात्मक पुरावे या पेपर बुकमध्ये समाविष्ठ नाहीत. जो पर्यंत हे पुरावे येत नाहीत, तोपर्यंत पुढील सुनावणी होऊ नये.
रवींद्र पाटील हा पोलिसांनी बनवलेला पुरावा होता, पोलिस सांगतील तसं तो बोलत होता, असंही अमित देसाई यांनी न्यायालयात म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.