मुंबई : सलमान खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी आज मुंबईतल्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी दोन मुख्य साक्षीदारांच्या जबानीची मूळ प्रत आणि काही महत्त्वाची हरवलेली कागदपत्रं पुन्हा सापडल्यानंतरची ही पहिलीच सुनावणी आहे. मागच्या सुनावणीत ही कागदपत्र सापडत नसल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं होतं.
काय आहे 'हिट अँड रन' प्रकरणाचा आत्तापर्यंतचा प्रवास...
- 28 सप्टेंबर 2002 - सलमानच्या गाडीनं वांद्रे इथं चौघांना उडवलं
- सलमान खान दारूच्या नशेत असल्याचा आरोप
- या अपघातात एक ठार, तर जण जखमी झाले होते
- 2005 मध्ये खटला सुरू झाला होता
- या प्रकरणात 11 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या होत्या
- एका साक्षीदारानं आपली साक्ष फिरवली
- सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला 10 वर्षांपर्यंत कैदेची शिक्षा सुनावली जाऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.