पहिल्याच आठवड्यात 'बजरंगी भाईजान'नं केली १०० कोटींची कमाई

'ईद'च्या निमित्तानं रिलीज झालेला सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच १०२.६ कोटींची कमाई केलीय. यासोबतच १०० कोटींचा गल्ला जमवणारा सलमानचा हा आठवा चित्रपट ठरलाय. 

Updated: Jul 20, 2015, 06:32 PM IST
पहिल्याच आठवड्यात 'बजरंगी भाईजान'नं केली १०० कोटींची कमाई title=

मुंबई: 'ईद'च्या निमित्तानं रिलीज झालेला सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच १०२.६ कोटींची कमाई केलीय. यासोबतच १०० कोटींचा गल्ला जमवणारा सलमानचा हा आठवा चित्रपट ठरलाय. 

वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, इरोज इंटरनॅशनल आणि एसकेएफनं घोषणा केलीय की, 'बजरंगी भाईजान'नं भारतात पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय केलाय. पहिल्या दिवशी चित्रपटानं २७.२५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर शनिवार आणि रविवारी चित्रपटानं क्रमश: ३६.६० कोटी आणि ३८.७५ कोटींचा गल्ला जमवला. व्यापार विश्लेषक कोमल नहाटा यांनी ट्विट केलंय की, पहिल्या आठवड्यात बजरंगीनं १०२.६० कोटींची कमाई केलीय.

या चित्रपटाच्या यशासोबतच सलमान पहिला असा अभिनेता बनलाय, ज्याच्या सर्वाधिक चित्रपटांनी १०० कोटींहून अधिक केलीय. तरण आदर्शनं ट्वीट केलंय की, बॉक्स ऑफिसवर बजरंगी भाईजाननं धूम केलीय. भारतात पहिल्या आठवड्यात १०० कोटींचा व्यापार केलीय. 

कबीर खान दिग्दर्शित बजरंगी भाईजानमध्ये सलमान खान सोबतच, करीना कपूर खान, नवाझुद्दीन सिद्धीकी आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.