सोनम कपूरला स्वाईन फ्लू, सलमानला नाही

अभिनेत्री सोनम कपूरला स्वाईन फ्लू झाल्याने बॉलीवूडमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र दबंग खान सलमानला देखिल स्वाईन फ्लू झाल्याची चर्चा होती, अखेर सलमान खानने स्वाईन फ्लूची टेस्ट करून घेतली आहे.

Updated: Mar 1, 2015, 12:37 PM IST
सोनम कपूरला स्वाईन फ्लू, सलमानला नाही title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरला स्वाईन फ्लू झाल्याने बॉलीवूडमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र दबंग खान सलमानला देखिल स्वाईन फ्लू झाल्याची चर्चा होती, अखेर सलमान खानने स्वाईन फ्लूची टेस्ट करून घेतली आहे.

स्वाईन फ्लूची टेस्ट केल्यानंतर सलमान खानला स्वाईन फ्लू नसल्याचं स्पष्ट झालं आहे, सोनम कपूरला राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू झाला होता, सोनम कपूरवर आता मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरातमधील राजकोटमध्ये शूटिंगदरम्यान सोनम कपूरला सर्दी खोकल्याच्या त्रास सुरू झाला होता. त्यानंतर केलेल्या चाचणीमध्ये सोनम कपूरला स्वाईन फ्लू झाल्याचं समोर आलं.
 
मुंबईमध्ये फिटनेस ट्रेनरमुळे सोनमला स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत राजकोटच्या जिल्हाधिकारी मनीष चंद्रा यांनी अधिक माहिती दिलीय. 
 
स्वाईन फ्लूमुळे सोनम कपूर आगामी चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’चं चित्रिकरण अजून पूर्ण करू शकली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.