आणखीन एका 'स्टार' अपत्याला भन्साळी करणार लॉन्च

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.... आणि याची जबाबदारी आपल्या शीरावर घेतलीय नन अनदर दॅन... संजय भन्साळी यांनी... 

Updated: Dec 31, 2015, 02:55 PM IST
आणखीन एका 'स्टार' अपत्याला भन्साळी करणार लॉन्च title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.... आणि याची जबाबदारी आपल्या शीरावर घेतलीय नन अनदर दॅन... संजय भन्साळी यांनी... 

संजय भन्साळी हे सध्या विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना याला लॉन्च करण्याची योजना बनवत आहेत. 

विनोद खन्ना यांचा सर्वात मोठा मुलगा राहुल खन्नानं आपल्या पहिल्याच 'अर्थ' या सिनेमासाठी सर्वश्रेष्ठ नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलाय. 

तर  दुसरा मुलगा अक्षय खन्ना हा देखील बॉर्डर, दिल चाहता है, हलचल यांसारख्या सिनेमांतून आपल्यासमोर आलाय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी याच्या सिनेमाचं दिग्दर्शन मुकेश छाबडा करणार आहेत. साक्षी हा याआधीही पूनम पांडे हिच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता.

संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर आणि ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर यांना २००७ मध्ये 'सावरिया' सिनेमातून लॉन्च केलं होतं.