फर्लो सुट्टीतत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज

बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्यानं अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनानं या वृत्तास दुजोरा दिला आहे.

Updated: Jan 7, 2015, 10:42 AM IST
फर्लो सुट्टीतत वाढ करण्यासाठी संजय दत्तचा अर्ज title=

मुंबई: बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त नुकताच चौदा दिवसांच्या संचित रजेवर (फर्लो) बाहेर आलेला असताना रजेत पुन्हा काही दिवसांची वाढ करावी यासाठी त्यानं अर्ज केला आहे. येरवडा कारगृह प्रशासनानं या वृत्तास दुजोरा दिला आहे.

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान अवैधरित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कैद्याला वर्षातून एकदा संचित रजा मिळते. 

२०१३ साली संजयला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर २०१४ साली त्यानं पुन्हा रजेसाठी अर्ज केला. २४ डिसेंबर रोजी त्याची १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र या रजेत आणखी काही दिवसांची वाढ करण्यात यावी असा अर्ज त्यानं केला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.