तुरुंगात राहून संजय दत्तनं खरेदी केली क्रिकेट टीम

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं कमालच केलीय... चक्क तुरुंगात राहून त्यानं एक क्रिकेट टीम खरेदी केलीय.  

Updated: Oct 23, 2015, 03:49 PM IST
तुरुंगात राहून संजय दत्तनं खरेदी केली क्रिकेट टीम title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं कमालच केलीय... चक्क तुरुंगात राहून त्यानं एक क्रिकेट टीम खरेदी केलीय.  

पुढच्या संयुक्त अरब आमिरातमध्ये वर्षी सुरू होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये एक टीम खरेदी केलीय. संजय दत्तची पत्नी मान्यता हीनं हा सगळा करार पूर्ण केलाय. रिटायर्ड क्रिकेटर्सच्या या लीगमध्ये जगभरातील माजी दिग्गज खेळाडू सहभाग घेणार आहेत. 

मंगळवारी दुबईत वीरेंद्र सेहवागसोबत ब्रायन लारा, ग्रीम स्मिथ आणि इतर अनेक क्रिकेटर या लीगच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते. 

संजयला खेळांमध्ये लहानपणापासूनच खूप आवड आहे... एमसीएल थोडी हटके आयडिया आहे आणि आम्ही चांगली गुंतवणूक केलीय, असं यावेळी मान्यता दत्त हिनं म्हटलंय. 

संजय दत्तनं यापूर्वी शिल्पा शेट्टीचा पती आणि आयपीएल फ्रेंचायजी राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा याच्यासोबत 2012 मध्ये सुपर फाईट लीगमध्ये गुंतवणूक केली होती. 1993 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटा दरम्यान शस्त्रास्त्रे बाळगळ्याप्रकरणी संजय दत्त सध्या तुरुंगात आहे... त्याची शिक्षा पुढच्या वर्षी पूर्ण होईल. 

भारतीय वन डे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा मित्र आणि रिती स्पोर्टसचे मालक अरुण पांडे यांनीही एमसीएल फ्रेंचायजीमध्ये गुंतवणूक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.