संजय दत्तचा मुलगा सिनेमात झळकणार

बॉलीवूड स्टार संजय दत्तचा मुलगा त्याच्याच वडिलांच्या होम प्रोडक्शन 'हसमुख पिघल गया' या सिनेमातून फिल्म जगतात पाऊल टाकतोय. या चित्रपटात तो राज कपूरच्या सिनेमातील लोकप्रिय गीताच्या रिमिक्स साँगमध्ये दिसणार आहे. 

Updated: Feb 7, 2016, 10:57 AM IST
संजय दत्तचा मुलगा सिनेमात झळकणार title=

मुंबई : बॉलीवूड स्टार संजय दत्तचा मुलगा त्याच्याच वडिलांच्या होम प्रोडक्शन 'हसमुख पिघल गया' या सिनेमातून फिल्म जगतात पाऊल टाकतोय. या चित्रपटात तो राज कपूरच्या सिनेमातील लोकप्रिय गीताच्या रिमिक्स साँगमध्ये दिसणार आहे. 

शहरान चित्रपटात राजकपूर यांच्या 'किसी की मुस्कुराहटों पे..' या गाण्यामध्ये एक छोटी भूमिका करतांना ते दिसणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार याची अजून काहीही माहिती सांगण्यात आलेली नाही. या चित्रपटात संजय दत्त याची भाची नाजिया हुसैन तसेच सिनेमा निर्माते ओ. पी रल्हन यांचा नातू अरमान देखील मुख्य भूमिकेत आहे.