नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला सुप्रीम कोर्टात दणका मिळालाय. काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान हायकोर्टानं सलमानच्या शिक्षेला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे.
ब्रिटनला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यात अडचण येत असल्याचं सांगत सलमाननं हायकोर्टातून स्थगिती मिळवली होती. याला राजस्थान सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
सुप्रीम कोर्टानं राजस्थान हायकोर्टाचा निर्णय रद्द करत खटल्याची सुनावणी पुन्हा करण्याचे आदेश हायकोर्टाला दिलेत. यामुळे आता सलमानच्या ब्रिटनवारीवर संक्रांत आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.