"ABCD-2" सेट लागली आग

रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.

Updated: Feb 27, 2015, 05:18 PM IST
 "ABCD-2" सेट लागली आग title=

मुंबई : रेमो डिझुझाचा आगामी चित्रपट "ABCD-2"च्या सेटवर आग लागल्याने शुटिंग थांबविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरूण धवन आणि श्रद्धा कपूर असून हे दोघे पुन्हा शुटिंग सुरू होण्यासाठी उत्सुक आहेत.

गुरूवारी चित्रपटाच्या सेटवर एक स्फोट झाला. हा अपघात गोरेगाव येथील फिल्म सिटीत झाला. 

वरूणने गुरूवार रात्री ट्विटरवरून सांगितले की, त्या ठिकाणी आग लागली आहे आमचा सेट जळून खाक झाला आहे. आम्ही ६०० जणांना सुरक्षित बाहेर काढले. आम्ही उद्या आमच्या कामावर पुन्हा जाणार आहोत. आम्ही नाचणे बंद करणार नाही. 

या आगीसंदर्भात श्रद्धानेही ट्विटरवर सर्व सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.  खूप वाइट झाले. पण आम्ही सर्व सुरक्षित आहोत. उद्या पुन्हा शुटिंग सुरू होणार आम्ही थिरकणे बंद नाही करणार... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.