...जेव्हा शाहरुख-सलमानने केला लुंगी डान्स

कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉसच्या नवव्या सीजनमध्ये बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान आणि किंग खान शाहरुख एकाच मंचावर दिसले. बऱ्याच कालावधीनंतर हे दोघं एका मंचावर एकत्र आले. 

Updated: Dec 20, 2015, 02:29 PM IST
...जेव्हा शाहरुख-सलमानने केला लुंगी डान्स title=

नवी दिल्ली : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉसच्या नवव्या सीजनमध्ये बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान आणि किंग खान शाहरुख एकाच मंचावर दिसले. बऱ्याच कालावधीनंतर हे दोघं एका मंचावर एकत्र आले. 

बिग बॉसच्या मंचावर या दोघांनी एकमेकांच्या गाण्यांवर ठुमकेही लगावले. शाहरुख बिग बॉसमध्ये आपल्या दिलवाले या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. 

शाहरुखने जेव्हा सलमान खानच्या ढिंका चिका या गाण्यावर डान्स केला तेव्हा सलमाननेही शाहरुखच्या चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील लुंगी डान्स करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले.