किंग खान शाहरूखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला फ्रान्सच्या 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 

Updated: Jul 2, 2014, 11:46 AM IST
किंग खान शाहरूखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार title=
फाईल फोटो

पॅरीस : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला फ्रान्सच्या 'नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 

फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री लॉरेन्ट फेबियस यांनी शाहरुखला मंगळवारी एका समारंभात हा पुरस्कार प्रदान केला. 

समारंभात शाहरुख बोलला की, 'मी या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी आभारी आहे. आज माझ्या आईचा जन्मदिवस आहे. ती जिवंत असती तर मला पुरस्कार मिळाल्याचा तिला खूप आनंद झाला असता. हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही तर शेकडो कलाकरांच्यातर्फे याचा स्वीकार करतोय. 

Moms b'day & Knight of the Legion of Honour. If she was alive apart from being extremely old she would be very happy.Thx all that is French.

— SHAH RUKH KHAN (@iamsrk) July 1, 2014

 

याआधी अमिताभ बच्चन यांना पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.