8 पॅक अॅब्स नाही... पाहा, शाहरुखचे 10 पॅक अॅब्स!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं आपल्या नुकत्याच बनवलेल्या आपल्या पिळदार शरीराला आणखी पिळदार बनवलंय... 

Updated: Sep 24, 2014, 08:47 PM IST
8 पॅक अॅब्स नाही... पाहा, शाहरुखचे 10 पॅक अॅब्स! title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं आपल्या नुकत्याच बनवलेल्या आपल्या पिळदार शरीराला आणखी पिळदार बनवलंय... 

नुकतंच काही दिवसांपूर्वी, ट्विटरवर आपल्या 8 पॅक्स अॅब्सचा फोटो जाहीर करणाऱ्या शाहरुखनं आता 10 पॅक अॅब्सचा व्हिडिओ जाहीर केलाय.  

आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये 8 पॅक्स, 8 पॅक्स बनवून बॉलिवूड स्टार्स शर्टाशिवाय लोकांसमोर येताना दिसत होते... पण, शाहरुखनं 10 पॅक अॅब्स बनवून या सगळ्याच अभिनेत्यांना मात दिलीय. 

शाहरुख खाननं ह्रतिक रोशनचं चॅलेंज स्विकारलं होतं... आणि त्याचाच एक भाग म्हणून शाहरुखनं 10 पॅक्स अॅब्स बनवून दाखवलेत... या व्हिडिओमध्ये शाहरुखचे 10 पॅक अॅब्स सहज दिसतायत. आपला आगामी सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ची दिग्दर्शिका फराह खान हिच्यासमोर शाहरुख जबरदस्त ट्रेनिंग घेताना दिसतोय.  

ह्रतिक रोशननं आपला आगामी सिनेमा ‘बँग बँग’च्या प्रदर्शनाआधी अनेक बॉलिवूड स्टार्सना ‘बँग बँग डेअर’ चॅलेंज देण्याचा धडाकाच लावलाय. ह्रतिकचं हे चॅलेंज स्वीकारण्याची उत्सुकताही इतर स्टार्स मंडळींमध्ये दिसतेय.

48 वर्षीय शाहरुख खान आजही आपल्या शरीरावर प्रयोग करताना दिसतोय... आणि आपल्या या पिळदार शरीराचं सगळं श्रेय तो त्याचा ट्रेनर प्रशांत सावंत याला देतोय.   

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.