नवी दिल्ली : बिग बॉस सीझन-8 मध्ये लवकर जोड्या जुळलेल्या दिसून येत आहेच. पहिल्या दिवशी उपेन पटेल आणि सुकृति दोघेही चांगले मित्र झाले तर दुसरीकडे उपेन पटेल हा नताशाला ‘तू खूप क्यूट आहे’ असंही म्हणताना आणि फ्लर्ट करताना दिसतोय.
‘बिग बॉस’चा दुसरा दिवस हा खूप गंमतीशीर ठरला. गौतम गुलाटीने झोपेची कुर्बांनी दिली होती. त्यामुळे तो गार्डनमध्ये आराम करत असताना डायंड्राने त्यांची पाठही चेपून दिली. त्यानंतर गौतम गुलाटी हा विमानात डायंड्राच्या पायाला मसाज करतानाही दिसला. दरम्यान, दुसरे स्पर्धेकही यावेळी तिथं उपस्थित होते... पण, गौतमला मात्र त्याची पर्वा नव्हती.
‘त्यानंतर, तुला शर्टलेस पाहयचे होते... शर्टलेस, लेदर, जीन्समध्ये चांगला दिसशील’ अशी कॉम्पिमेंटही डायंड्रानं गौतमला दिली. यानंतर, गौतमही मूडमध्ये आला... ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे प्यार दूँगा’ असा डायलॉगही गौतमनं डायंड्रासमोर मारला. पुढील काळात ही मैत्री किती रंगदार होईल, हे पहायला मज्जा येईल.
दुसऱ्या दिवशी घरात काय घडले -
पाण्यासाठी सुकृति आणि मिनिषाने घेतली मेहनत -
दुसऱ्या दिवशी बिग बॉसच्या विमानात पाण्याचा सप्लाय बंद केला होता. त्यासाठी स्पर्धेकांकडून सीक्रेट सोसायटीने सांगितले की, कोणत्याही दोन स्पर्धेकांनी सतत सायकल चालविली पाहिजे. जोपर्यंत सायकल चालणार तोपर्यंत त्यांना पाणी मिळेल. हा टास्क मिनिषा आणि सुकृतिने करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघंनी हा टास्क पूर्णदेखील केला.
उपेन ओरडल्यानंतर सुकृति रडली -
जेव्हा सुकृति आणि मिनिषा पाण्यासाठी सायकलिंग करत होत्या. तेव्हा सीक्रेट सोसायटीच्या सदस्यांनी या टास्कमध्ये थोडा ट्विस्ट आणले. की, पाण्याचा प्रवाह कायम ठेविण्यासाठी सर्व स्पर्धेकांना एकत्र गार्डेनमध्ये उपस्थित रहणे गरजेचं होतं.
दरम्यान, उपेन आणि गौतम रात्री जागरण केल्यामुळे विमानात झोपण्यासाठी गेले होते. जेव्हा सुकृति त्यांना बोलविण्यासाठी गेली होती. तेव्हा उपेन तिला रागात काही तरी बोल त्यांनी ती रडू लागली. बिग बॉसच्या घरात ओरडणे-रडणे हे काही आश्चर्यकारक नाही. पण यांची सुरूवात मात्र सुकृतिपासून झाली. सुरुवातीला उपेन आणि सुकृति हे चांगले मित्र होते. आता त्यांची ही मैत्री किती दिवस चालेले हे पाहण्यासारखे आहे.
त्यानंतर सीक्रेट सोसायटीने स्पर्धेकांनाची इच्छा शक्ती पडताळण्यासाठी अजून एक टास्क घेतला. त्यात आर्य बब्बर आणि सोनी सिंग यांना न जेवता राहयचे होते. जेवण पाहल्यानंतर भूक लागू नये म्हणून त्या दोघांनी विमानात स्वतःला कैद केले होते.
सुशांत-डायंड्राचा मायकल जॅक्सन पॉझ -
सीक्रेट सोसायटीने खाणे-पिणे काय? पण फिरण्यावर सुद्धा बंधणे घातली आहे. त्यांनी डायंड्रा आणि सुशांत यांना चिखलात माखलेले असून त्यांना मायकल जॅक्सनसारख्या स्टायलमध्ये उभे राहायला सांगितले होते.
या दोघांनी एकदम मूर्तीसारखे उभे राहयला सांगितले. सीक्रेट सोसायटीच्या सदस्यांचा आदेश येईपर्यंत तरी ते हलू शकत नाही. त्यांना फक्त इतर स्पर्धेकांशी बोलण्याची सूट दिली होती.
जर या दोघांपैकी कोण एक थोडं जरी हलला तरी सर्व स्पर्धेकांना ते ज्या अवस्थेत आहेत. त्याच अवस्थेत फ्रीज व्हावे लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.