मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या तयारीत खूपच व्यस्त आहे. या लग्नासाठी तो त्याचा जुना मित्र शाहरुख खान याला बोलावणार किंवा नाही, ही चर्चा जोरात सुरू आहे.
पण, किंग खाननं मात्र इथंही बाजी मारलीय. आपण सलमानच्या बहिणीच्या लग्नाला जाणार असल्याचं त्यानं त्याला निमंत्रण मिळण्याआधीच सांगून टाकलंय.
‘अर्पिता ही माझ्या लहान बहिणीसारखी आहे... मी तिला माझ्या अंगाखांद्यावर खेळवलंय... मग, मला आमंत्रण मिळो अथवा नाही... मला तिच्या लग्नासाठी जायलाच हवं...’ असं म्हणत शाहरुखनं आपलं मोठं मन दाखवलंय.
याचाच अर्थ, अर्पिताच्या लग्नाच्या निमित्तानं शाहरुख आणि सलमान यांची पुन्हा एकदा भेट होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.