'भाभीजी' आयटम साँगवर 'चिंटू'सोबत थिरकणार!

प्रेक्षकांची लाडकी 'भाभीजी' अर्थातच अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत दिसणार आहे चिंटू... अर्थातच अभिनेते ऋषी कपूर... 

Updated: Aug 2, 2016, 04:24 PM IST
'भाभीजी' आयटम साँगवर 'चिंटू'सोबत थिरकणार! title=

मुंबई : प्रेक्षकांची लाडकी 'भाभीजी' अर्थातच अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत दिसणार आहे चिंटू... अर्थातच अभिनेते ऋषी कपूर... 

'भाभीजी घर पर है' या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्यानंतर शिल्पा शिंदे बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे.

आता मात्र ती छोट्या पडद्यावर नाही तर मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या समोर येतेय. 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात ती अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत आयटम साँगवर थिरकताना दिसेल.  

'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात ऋषी कपूर यांच्याशिवाय परेश रावल आणि वीर दास यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत.