श्रीदेवींच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबतचा किसींग फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Updated: Aug 2, 2016, 03:12 PM IST
श्रीदेवींच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबतचा किसींग फोटो व्हायरल title=

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. जान्हवीचे शिखर पहारीयाबरोबरचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाल्याने सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधीच तिच्यावर चर्चा रंगू लागली आहे.

शिखर पहारीया हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. पिंकविला डॉट कॉमच्या माहितीनुसार शिखर हा वीर पहरीयाचा भाऊ आहे. काही दिवसांपूर्वी सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु होत्या.

जान्हवी आणि शिखरचे एका पार्टीमधले फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. जान्हवी सध्या अमेरिकेत असून, तिथे अभिनयाचे धडे घेत आहे. पण सध्या तरी ती त्या किसींग फोटोमुळे चर्चेत आली आहे.