गायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल

मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना शनिवारी छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Updated: May 29, 2016, 09:20 AM IST
गायक आनंद शिंदे रुग्णालयात दाखल title=

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना शनिवारी छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कल्याणच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिंदे यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचं आढळलंय.

त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. तेथे त्यांच्यावर बायपास सर्जरी होण्याची शक्यता आहे.