सोहा अली खान आता चित्रपट निर्मिती करणार

अभिनेत्री सोहा अली खान आता चित्रपट निर्मिर्ती क्षेत्रात उतरणार आहे. तिचा पती अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा हे एक प्रोडक्शन हाऊस  चालवणार आहेत.

Updated: Sep 19, 2016, 05:22 PM IST
सोहा अली खान आता चित्रपट निर्मिती करणार title=

मुंबई: अभिनेत्री सोहा अली खान आता चित्रपट निर्मिर्ती क्षेत्रात उतरणार आहे. तिचा पती अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा हे एक प्रोडक्शन हाऊस  चालवणार आहेत.

सोहाचा पहिला चित्रपट हा प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनावर आधारित असल्याचं सोहानं म्हटंल आहे. 'आम्ही रिनिगेट नावाची स्वत:ची चित्रपट कंपनी उभारणार आहोत, आम्ही चित्रपट निर्मिती एकत्र करणार असून नवीन कल्पना आहेत अशी लोकं आम्हाला हवी आहेत. जी आमच्या विचारांना सहकार्य करु शकतील असं देखील सोहाने म्हटलं आहे.