प्रिती झिंटाच्या आयुष्यात आलंय, 'कुणीतरी खास'

आयपीएल सिझन ८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची मालकीण बाई प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर चमक दिसून आली आहे, यामागे नेमकं काय रहस्य आहे हे तुम्हाला अजून माहित नसेल.

Updated: Apr 16, 2015, 08:09 PM IST
प्रिती झिंटाच्या आयुष्यात आलंय, 'कुणीतरी खास' title=

मुंबई : आयपीएल सिझन ८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची मालकीण बाई प्रिती झिंटाच्या चेहऱ्यावर चमक दिसून आली आहे, यामागे नेमकं काय रहस्य आहे हे तुम्हाला अजून माहित नसेल.

प्रिती झिंटाचं आपला या आधीचा बॉयफ्रेन्ड नेस वाडिया सोबत आता ब्रेक-अप झाल्याने, ती आता कंटाळली आहे. एवढंच नाही तर तिच्या आयुष्यात आता कुणीतरी खास व्यक्ती देखिल आली आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रिती झिंटाने म्हटलं आहे, मी आता एका खास व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये आहे, आता माझ्याकडे स्वत:साठी वेळ आहे. क्रिकेट या विषयात आता राहण्याची आता माझी गरज नाहीय. नेस वाडिया के साथ वादग्रस्त ब्रेक-अप नंतर, प्रिती झिंटाचं आता पहिलं स्टेटमेंट आलं आहे.

प्रितीला जेव्हा विचारण्यात आलं नेस वाडिया सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर, या रिलेशनशिपमधून तुला बाहेर येणं कठीण होतं का?, यावर प्रिटी झिंटाने उत्तर दिलं आहे, "मला माहित आहे जीवनात कधी कुठे कसं पुढे जायचं?"

प्रिती झिंटा लॉस एंजिलिसच्या नेहमी फेऱ्या मारत असते आणि तिचा विशेष व्यक्ती तिथेच असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.