मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला बिकनीबाबत प्रश्न एका नेटिझनने विचारला. त्यावेळी असभ्य ट्विट करणाऱ्या नेटिझनला चांगलेच खडसावले.
सोनाक्षी तू बिकनी कधी घालणार? असा प्रश्न ट्विटरवर प्रतिक गोयल याने सोनाक्षीला विचारला होता. त्यावर संतप्त झालेल्या सोनाक्षीने तुझ्या आई-बहिणीला हा प्रश्न विचार आणि त्यांचे काय म्हणणे आहे ते मला सांग, असे परखड उत्तर दिले.
सोनाक्षीने ट्विटर ‘इट्स टाइम फॉर शूट’ असे ट्विट केले होते. त्यावर तिच्या एका फॉलोअरने ‘सोनाक्षी तू अंगप्रदर्शन कधी करणार, तू बिकनी कधी घालणार?’, असा प्रश्न विचारला. त्यावर सोनाक्षीने या असभ्य ट्विटचे स्क्रिनशॉट काढून पोस्ट केले आणि समाचार घेतला.
तुझ्या आई-बहिणीला हा प्रश्न विचार, असा रिप्लाय सोनाक्षीने दिला. दरम्यान, संबंधित तरुणाने माफी मागितल्याने प्रत्युत्तरादाखल आपण केलेले ट्विट मागे घेत असल्याचे सोनाक्षीने ट्विटवर जाहीर केलेय.
Im deleting the tweet because he apologized. I hope he and his type learnt a good lesson in respecting women, no matter which profession.
— Sonakshi Sinha (@sonakshisinha) February 8, 2016