सोनू निगमने शेअर केला अजानचा व्हिडिओ

अजानवर सुरु असलेल्या विवादानंतर बॉलिवूडमधील गायक सोनू निगमने रविवार सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 23, 2017, 09:49 AM IST
सोनू निगमने शेअर केला अजानचा व्हिडिओ title=

नवी दिल्ली : अजानवर सुरु असलेल्या विवादानंतर बॉलिवूडमधील गायक सोनू निगमने रविवार सकाळी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सोनूने अजानचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तो ट्विटरवर शेअर केला आहे, सकाळी होणाऱ्या अजानचा त्याने हा व्हिडिओ शूट केला आहे. ट्विटमध्ये सोनू निगमने म्हटलं आहे की, गुडमॉर्निंग इंडिया।

सोनू निगम काही दिवसांपासून मस्जिदमध्ये लाऊड स्पीकरवर वाजणाऱ्या अजानवर नाराज आहे. सोनू निगमने हा मुद्दा उचलल्यानंतर अनेकांनी त्याचं स्वागत केलं तर अनेकांनी त्याच्यावर टीका ही केली.