पाहा सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा स्पूफ व्हिडिओ

या दिवाळीत सलमान खानचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटाचं ट्रेलर आणि गाणं आधीच हिट झालंय. फिल्म बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करेल, असं आम्ही नाही तर 'प्रेम रतन धन पायो'चा स्पूफ व्हिडिओ म्हणतोय.

Updated: Oct 13, 2015, 05:27 PM IST
पाहा सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा स्पूफ व्हिडिओ title=

मुंबई: या दिवाळीत सलमान खानचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटाचं ट्रेलर आणि गाणं आधीच हिट झालंय. फिल्म बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करेल, असं आम्ही नाही तर 'प्रेम रतन धन पायो'चा स्पूफ व्हिडिओ म्हणतोय.

'शुद्ध देसी एंडिंग्स' यांनी यूट्यूबवर रिलीज केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ९० हजारहून अधिकांनी पाहिलंय. या व्हिडिओमध्ये 'प्रेम रतन धन पायो' या टायटलच्या जागी 'प्रेम करोड धन लायो' हे नाव दिलंय. 

आणखी वाचा - धमाकेदार ट्रेलरनंतर सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चं पहिलं गाणं रिलीज

तसंच 'या दिवाळीत भाईजान इज बॅक प्रेम से, हर प्रोड्यूसर कमाए धन, मान से सन्मान से... सलमान से' असं कॅप्शन दिलंय. व्हिडिओत अॅनिमेटेड लूकमधील सलमानचा खास डायलॉग पण आहे, 'हर फिल्म फ्लॉप हो सकती है पर वो खुशनसीब है जिनकी फिल्म में सलमान होता है.'

स्फूफ व्हिडिओ - 

 

'प्रेम रतन धन पायो'चं ट्रेलर: 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.