सुल्तानची ५ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई

सलमान खानच्या 'सुल्तान'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील 'सुल्तान' हा ५ दिवसात २०० कोटी कमावणारा पहिला सिनेमा बनला आहे. प्रसिद्ध ट्रेड विश्लेशक तरन आदर्शने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Updated: Jul 11, 2016, 01:10 PM IST
सुल्तानची ५ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई title=

मुंबई : सलमान खानच्या 'सुल्तान'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील 'सुल्तान' हा ५ दिवसात २०० कोटी कमावणारा पहिला सिनेमा बनला आहे. प्रसिद्ध ट्रेड विश्लेशक तरन आदर्शने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

६ जुलैला रिलीज झालेल्या सुल्तानची जादू लोकांवर चांगली चालली. सुल्तान पाहण्यासाठी लोकं सिनेमागृहाकडे वळतायंत. ईदला रिलीज झालेल्या सुल्तानने बुधवारी 36.54 कोटी, गुरुवारी 37.32 कोटी, शुक्रवारी 31.66 कोटी आणि शनिवारी 37.10 कोटींची कमाई केली.

सुल्तान हा भारतातला पहिला सिनेमा ठरला आहे ज्याने ५ दिवसात २०० कोटी कमाई केली आहे. रविवारचा आकडा अजून समोर आलेला नाही. भारताबाहेरही सुल्तान 200 कोटींची कमाई करेल असं म्हटलं जात आहे. 

भारतात कमाईच्या बाबतीत बजरंगी भाईजानने एका आठवड्यात १०३ कोटी कमावले होते. सुल्तानने या सिनेमाला मागे टाकलं आहे.