रिलीज आधीच 'सुल्तान'चं अनोखं रेकॉर्ड

सलमान खान आणि अनुष्का शर्माचा सुल्तान हा चित्रपट अजून रिलीज झालेला नाही

Updated: May 26, 2016, 07:07 PM IST
रिलीज आधीच 'सुल्तान'चं अनोखं रेकॉर्ड title=

मुंबई : सलमान खान आणि अनुष्का शर्माचा सुल्तान हा चित्रपट अजून रिलीज झालेला नाही, पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी आत्ताच डोक्यावर घेतलं आहे. सुल्तानच्या ट्रेलरला आत्तापर्यंत 5 मिलीयन म्हणजेच 50 लाख व्ह्यूज आले आहेत. एवढ्या कमी वेळात एवढे व्ह्यूज मिळवणारा सुल्तान हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 24 मे ला सुल्तानचा ट्रेलर लॉन्च झाला होता. 

या चित्रपटामध्ये सलमान सुल्तान आहे, तर अनुष्कानं आरफाचा अभिनय केला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सलमानबरोबर रणदीप हुडा आणि अनुष्का शर्माही दिसत आहेत. 

हरियाणाचा पहलवान सुल्तान अली खानच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेमध्ये आहे. रणदीप हुडानं सलमानच्या कोचची भूमिका बजावली आहे. सुल्तान यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. 

पाहा सुल्तानचा ट्रेलर