मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मासोबतच्या वादानंतर डॉ. मशहूर गुलाटी म्हणजेच सुनील ग्रोव्हरने अखेर मौन सोडलेय. कपिलने सोशल मीडियावर याप्रकरणी माफी मागितल्यानंतर सुनीलने यावर विधान केलंय.
बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत सुनील म्हणाला, मी संपूर्ण तमाशा बघतोय. हे बघताना मजा येतेय. माझा स्वत:वर विश्वास आहे. भविष्यातील योजनांबाबत मी विचार करतोय. सध्या मी फक्त तमाशा बघतोय आणि त्याची मजा घेतोय.
कपिल आणि सुनील यांच्यात विमान प्रवासादरम्यान मोठा वाद झाला होता. विमानात कपिलने सुनीलला अपशब्दच वापरले नाहीत तर त्याला मारहाणही केली होती. त्यानंतर हा वाद चांगलाच चर्चेत आला.
कपिलच्या शोमधील अनेक कलाकारांनी यापूर्वीच शो सोडलाय. त्यामुळे कपिलचा शो आधीच अडचणीत सापडलाय. त्यात आता कपिलच्या गैरवर्तणुकीमुळे एअर इंडियाही त्याच्यावर बंदी घालण्याची शक्यता आहे.