फिल्म रिव्ह्यू : सुपर नानी की सुपर फ्लॉप नानी

'सुपर नानी' हा सिनेमा रेखाचा कमबॅक सिनेमा म्हणून प्रमोट केला गेला. या आधी कधीही कोणत्या टेलीव्हिजनवर न दिसणारी रेखा अनेक टेलीव्हिजन शोमध्ये दिसून लागली होती. या सिनेमापेक्षा त्याचा प्रमोशन जास्त मज्जेशीर होते. सुपर नानी हा सिनेमा मात्र इतकासा खास नसून रेखासारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या दर्जाचा हा सिनेमा नाही.  

Updated: Nov 1, 2014, 08:43 AM IST
फिल्म रिव्ह्यू : सुपर नानी की सुपर फ्लॉप नानी title=

मुंबई: 'सुपर नानी' हा सिनेमा रेखाचा कमबॅक सिनेमा म्हणून प्रमोट केला गेला. या आधी कधीही कोणत्या टेलीव्हिजनवर न दिसणारी रेखा अनेक टेलीव्हिजन शोमध्ये दिसून लागली होती. या सिनेमापेक्षा त्याचा प्रमोशन जास्त मज्जेशीर होते. सुपर नानी हा सिनेमा मात्र इतकासा खास नसून रेखासारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या दर्जाचा हा सिनेमा नाही.  

सिनेमाचं कथानक - 

रेखा (भारती)च्या भूमिकेत असून रणधीर कपूर (भारत) हे त्यांच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यांच्या कुटुंबांबरोबर राहत असतात. कालांतराने कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपआपल्या कामात व्यस्त होतात. सर्वांना असे वाटेत की, भारती म्हणजे (रेखा)ची जागा ही फक्त स्वयंपाक घरात आहे. त्याचे कुटुंब नेहमी त्यांचा अपमान करत असते. तेव्हा भारतीचा नातू मन म्हणजे (शरमन जोशी) याला आजीचे होणारे हाल बघवत नाही. म्हणून कुटुंबातील व्यक्तींचे डोळे उघडण्यासाठी तो आजीला मॉडेल बनवितो. मग सुपर फ्लॉप सिनेमाला सुरुवात होते. 

सिनेमातील डायलॉग सुद्धा प्रभावी नाहीत. त्यामुळे रेखा, अनुपम खेर आणि शरमन जोशी यासारख्या कलाकारांनी या सिनेमात काम केले हिच मोठी गोष्ट आहे.    

या सिनेमात रेखा, अनुपम आणि शरमन जोशी यांचे अभिनय उत्कृष्ट दर्जाचा आहे. पण, या सिनेमातील कथानक यांच्या अभिनयाला न्याय देणारी नाही. इंद्र कुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक केले आहे. त्यांनी बेटा सारखा यशस्वी सिनेमा बनविला आहे. ग्रान्ड मस्ती यासारखा हलकाफूलका सिनेमा सुद्धा त्यांनी बनविला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.