काळवीट शिकार : सलमान खान खटल्याचा आज निकाल अपेक्षित

अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज जोधपूर न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. 

Updated: Jan 18, 2017, 07:43 AM IST
काळवीट शिकार : सलमान खान खटल्याचा आज निकाल अपेक्षित title=

जोधपूर : अभिनेता सलमान खान विरोधात राजस्थानमध्ये सुरू असललेल्या अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगण्याच्या खटल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज जोधपूर न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित आहे. 

सलमानवर आरोप सिद्ध झाले, तर त्याला जास्तीत जास्त तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 1998 साली सलमान खाननं एका चिकांरा जातीच्या हरणाची आणि दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये खटला दाखल करण्यात आला. तेव्हापासून सलमान खानवर एकूण चार खटले सुरू होते. 

त्यापैकी चिंकारा जातीच्या हरिणाची शिकार केल्याप्रकरणी दाखल दोन खटल्यांमध्ये सलमानची राजस्थान हायकोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. तिसरा दोन  काळवीटांच्या शिकारीचा खटला अजूनही सुरू आहे.  तर चौथ्या अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या खटल्यावर आज जोधपूरमध्ये निकाल अपेक्षित आहे. 

या खटल्यात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 3 अंतर्गत 25 आणि 27व्या तरतूदीनुसार जंगलात मुदत संपलेला परवान्याच्या आधारे शस्त्र बाळगल्याचा सलमानवर आरोप आहे. याप्रकरणी 9 जानेवारीला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झालाय. त्यादिवशी न्यायाधीश दलपतसिंह राजपुरोहित यांनी निकाल आजपर्यंत राखून ठेवला होता. त्यामुळे आज अतिंम निकाल जाहीर होण्याची शक्यताय. त्यासाठी सलमान आणि त्याची बहिण अलविरा कालच संध्याकाळी जोधपूरमध्ये दाखल झाले आहे.