सुशांत सिंह राजपूत चढला बोहल्यावर!

सध्या, 'काय पो छे'फेम सुशांत सिंह राजपूतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या पत्नीच्या रुपात दिसतेय ती अभिनेत्री कायरा अडवाणी... 

Updated: Feb 4, 2016, 02:52 PM IST
सुशांत सिंह राजपूत चढला बोहल्यावर!

मुंबई : सध्या, 'काय पो छे'फेम सुशांत सिंह राजपूतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या पत्नीच्या रुपात दिसतेय ती अभिनेत्री कायरा अडवाणी... 

घाबरू नका... सुशांत आणि अंकिता लोखंडे यांचं नातं अजूनही कायम आहे. या फोटोंमधून सुशांत बोहल्यावर चढलाय हे नक्कीच दिसतंय. पण, तो रीअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये विवाहबंधनात अडकलाय. 

'फुगली' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सुशांत सध्या 'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमात साक्षी धोनीच्या भूमिकेत कायर अडवाणी दिसणार आहे. धोनीच्या लग्नाच्या सीनची शुटिंग सुरू असतानाचे हे फोटो आहेत. 

'धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचं दिग्दर्शन नीरज पांडे करत आहे. हा सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचं बहुतांश शुटिंग रांचीमध्ये झालंय. या सिनेमात अनुपम खेर धोनीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे.