रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

Updated: Mar 4, 2015, 03:02 PM IST
रणबीर कपूरनं दीपिकाला प्रपोज केलं, फोटो लीक! title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या प्रपोजलचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. ऐकून धक्का बसला ना... पण ही डेट रिअल लाइफ नाही रिल लाइफमधील आहे.

दोघंही सध्या इम्तियाज अलीचा चित्रपट 'तमाशा'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा सीन त्यांच्या चित्रपटाचा एक भाग आहे. रणबीर आणि दीपिकाचा हा तिसरा चित्रपट आहे.

'तमाशा'पूर्वी 'बचना ऐ हसिनों' आणि 'ये जवानी है दिवानी'मध्ये हे दोघं एकत्र होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. 

मोठ्या पडद्यावरची या दोघांची केमेस्ट्री सर्वांनाच पसंत पडते. म्हणूनच त्यांच्या ब्रेकअपनंतरही चित्रपट निर्माता दोघांना एकत्र फिल्ममध्ये घेण्यासाठी मेहनत करतात. 'तमाशा' याच वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.