मुंबई: तेलुगू अभिनेत्री आरती अग्रवालचं शनिवारी अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ती केवळ ३१ वर्षांची होती. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला.
आरतीच्या मॅनेजरनं दिलेल्या माहितीनुसार, 'आरती लठ्ठपणामुळे त्रस्त होती आणि तिला आतड्यांचा आजार होता. त्यावरच उपचार सुरू होते. मात्र अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला.'
आरतीनं २००१मध्ये तेलुगू चित्रपट 'नुव्वु नाकु नचव'पासून अभिनयाला सुरूवात केली होती आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तिनं 'नुव्वु लेका नेनु लेनु', 'इंद्रा' आणि 'वसंतम' या चित्रपटांमध्ये काम केलं. २००५मध्ये सहकलाकार तरुण सोबत असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये कटुता निर्माण झाल्यानं तिनं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.
आरतीनं जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं. तिचा अखेरचा चित्रपट 'रनम-२' शुक्रवारी रिलीज झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.