मुंबई : जावेद अख्तर यांची मुलगी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधून आपले कौशल्य सिद्ध केलेच आहे. पुन्हा एकदा झोया मल्टी स्टारर चित्रपट घेवून आली आहे. झोयाचा हा चित्रपट नातेसंबंधामधील एक असा पदर उलगडतो ज्यात आतून काहीतरी आणि बाहेरून काही वेगळेच जग दिसते.
काय आहे कथानक
या चित्रपटाचे कथानक मेहरा कुटुंबाभोवती फिरत राहते, ज्यात कमल मेहरा आणि त्यांची पत्नी नीलम (अनिल कपूर आणि शेफाली) मुख्य भुमिकेत आहेत. त्यांची दोन
मुले आयेशा (प्रियांका चोप्रा) आणि कबीर (रणबीर कपूर) असून, या श्रीमंत कुटुंबाने दिल्लीमध्ये एका छताखाली एक सुंदर जग निर्माण केले आहे. शहरातील नामांकित उद्योगपती कमल मेहरा कुटुंब एक आनंदी कुटुंब असून कुटुंबातील प्रत्येक सदस्य वेगळेच आयुष्य जगत आहे. कमल मेहरा यांचा जास्त वेळ व्यवसाय वाढविण्यात गेल्यामुळे त्यांना आपली पत्नी नीलमसाठी वेळ देता येत नसतो.
कमल आणि नीलम यांच्यातील नातं जगाला दाखविण्यासाठी परिपूर्ण आहे, पण त्यांच्या नात्यात आतल्याआत दुरावा आहे. सोबत काही गुपितही आहेत. आपल्या लग्नाच्या 30 व्या वाढदिवसाला मेहरा परिवार आपल्या श्रीमंत मित्रमंडळींसह क्रूझ वर घेवून जाते. आणि इथूनच पुढील रंजक घटना घडत जातात.
कसा केला अभिनय
अभिनेता अनिल कपूर याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांनी रंगविलेल्या कमल मेहराच्या भुमिकेला तोड नाही. कबीर आणि आयेशाची भुमिका रणबीर आणि प्रियांकाने फार चांगली वठवली आहे. अनुष्का शर्मा आणि
फरहान यांनीही आपल्या भुमिका अगदी सुंदर वठविल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीरेखा कलाकारांनी फार सुंदररितीने निभावली आहे.
चित्रिकरण कुठे
इस्तंबुल, स्पेन, तुर्कस्तान, फ्रांस आणि इटली येथील चित्रीकरण मनमोहक आहेत. या चित्रपटाचे जास्त चित्रीकरण विदेशात केल्यामुळे तो आकर्षक बनला आहे.
कसा वाटला चित्रपट
या चित्रपटाचे संगीतही चांगले आहे. एकंदर हा चित्रपट तुमचे चांगलेच मनोरंजन करेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.