मुंबई : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींकडून होणारा त्रास काही नवा नाही. बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तला सोशल मीडियावरुन सलमान नसीर नावाच्या व्यक्तीने त्रास दिला. मात्र याने घाबरुन जाईल ती त्रिशाला कसली. तिनेही त्याला चांगलाच धडा शिकवला.
सलमान नसीरने सोशल मीडियावर त्रिशालाल शिवीगाळ केली. याला त्रिशालाने चांगलेच प्रत्युत्तर दिले. सलमान नावाची एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर त्रास देत होता. त्या इसमाने त्रिशाला डेटवर येण्यास सांगितले. त्रिशालाने त्याला कोणतेही उत्तर न दिल्याने त्याने शिवीगाळ केली.
यानंतर त्रिशालाने पूर्ण चॅटचा स्क्रीनशॉट काढून या सर्व फोटोंना इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी रिचा दत्तची मुलगी आहे. ती न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजी-आजोबांसोबत राहते.