बाजीराव पेशव्यांसारख्या बॉडीसाठी रणवीरने काय केलं?

मुलाखतीत रणवीरने मान्य केलं आहे की, बाजीराव पेशव्यांचा रोल करणे त्याच्यासाठी फार कठीण होते. शुटिंग शिवाय रणवीर आठ तास ट्रेनिंग करत होता, यात तो दोन तास स्पीच आणि उच्चारांचं ट्रेनिंग घेत होता, चार तास घोड्याची रपेट होती, आणि इतर दोन तास फिजिकल वर्कआऊटचाही समावेश आहे.

Updated: Dec 16, 2015, 11:28 PM IST
बाजीराव पेशव्यांसारख्या बॉडीसाठी रणवीरने काय केलं? title=

मुंबई : मुलाखतीत रणवीरने मान्य केलं आहे की, बाजीराव पेशव्यांचा रोल करणे त्याच्यासाठी फार कठीण होते. शुटिंग शिवाय रणवीर आठ तास ट्रेनिंग करत होता, यात तो दोन तास स्पीच आणि उच्चारांचं ट्रेनिंग घेत होता, चार तास घोड्याची रपेट होती, आणि इतर दोन तास फिजिकल वर्कआऊटचाही समावेश आहे.

पेशव्यांसारखी बॉडी कमवण्यासाठी रनवीरला दोन प्रकारच्या शरीरयष्टीची गरज होती, यामुळे रणवीरने स्वीडिश बॉडी ट्रेनर खास ट्रेनिंगसाठी ठेवला होता, यात मसल्स मास बिल्ड करणे, आणि बॉडीसाठी लोअर पार्टचा फॅट कमी करणेही कठीण होते, यासारखी बॉडी मिळवण्यासाठी रणवीरने दोन फेजमध्ये ट्रेनिंग केली.

पहिल्या फेजमध्ये रणवीरने वेट ट्रेनिंग करण्यासाठी मिनिमम कार्डिओ ट्रेनिंग केली, दुसऱ्या फेजमध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ वर्कआऊट वाढवलं, पहिल्या फेजमध्ये डायटमध्ये प्रोटीन आणि कर्ब्स सामिल होते, दुसऱ्या फेजमध्ये कर्ब्स कमीत कमी केले गेले.