VIDEO : मुक्ता-स्वप्नीलसाठी 'बँन्ड बाजा वरात घोडा' सज्ज

मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोडी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय ती 'मुंबई - पुणे - मुंबई २' या सिनेमातून... याच सिनेमातलं एक नवं कोरं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.  

Updated: Oct 28, 2015, 02:49 PM IST
VIDEO : मुक्ता-स्वप्नीलसाठी  'बँन्ड बाजा वरात घोडा' सज्ज title=

मुंबई : मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोडी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतेय ती 'मुंबई - पुणे - मुंबई २' या सिनेमातून... याच सिनेमातलं एक नवं कोरं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.  

गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात मुक्ता, स्वप्नील यांनी एक लाईव्ह परफॉर्मन्सही सादर केला. यावेळी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, विजय केंकरे, मंगल केकरे असे इतर इतर सहकलाकारही उपस्थित होते. 

'बँन्ड बाजा वरात घोडा' असा सगळ्या गोष्टी या दोघांच्या 'शुभमंगल'साठी सज्ज झालेल्या या गाण्यात दिसतायत.  

हा सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.