व्हिडिओ : सनी देओल इज बॅक... पाहा, 'मोहल्ला अस्सी'चा ट्रेलर

अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतोय. सनीचा 'मोहल्ला अस्सी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Updated: Jun 17, 2015, 05:08 PM IST
व्हिडिओ : सनी देओल इज बॅक... पाहा, 'मोहल्ला अस्सी'चा ट्रेलर title=

मुंबई : अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतोय. सनीचा 'मोहल्ला अस्सी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

याच सिनेमाचा ट्रेलर नुकताच जाहीर करण्यात आलाय. बनारच्या धार्मिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं कथानक बेतलंय.

हा सिनेमा दिग्दर्शित केलाय 'पिंजर'फेम चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी... तर या सिनेमात सनीसोबतच साक्षी तन्वर आणि रवी किशन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

या चित्रपटाचं चित्रीकरण 2011 मध्येच पार पडलं होतं... पण, प्रदर्शन मात्र रेंगाळलं. आता चित्रपटाचे निर्माते विनय तिवारी यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट केलंय.

व्हिडिओ पाहा :- 
 

width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/CG7xhXOWuYM" frameborder="0" allowfullscreen>

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.